गोग्रास योजना

आमच्या या गोवंशसंवर्धन अभियानात आपणही सहागी होऊ शकता. प्रत्येक भारतीय नागरिकाने गाय पाळयलाच हवी असे नाही. आपण आपल्या कमाईतून गाईंसाठी 'गोग्रास दान' देऊ शकतो. आपल्या गोग्रास दानाची आपणाला नवजीवनतर्फे रितसर पावती दिली जाईल आणि उपयोगिता प्रमाणपत्रही.

गाईला चारापाणी, अन्नदान, खाण्याचा खुराक म्हणजे गोग्रास. पारंपरिक श्रद्धेनुसार मंगलकार्यात, आनंदमय प्रसंगात, मृत्यूपश्चात कार्यात व विधीत गायीला गोग्रासाचे म्हणजेच अन्नदानाचा विधी सांगितला आहे. आमची संस्था यासाठीच गाय 'गोग्रास दान' स्विकारते १ दिवस खर्चानुसार १ दिवसासाठी ते संपूर्ण वर्षासाठी खर्च स्विकृत केला जातो. साधारणत: दिवसाचा खर्च सध्या १००/- रु गृहित आहे. गोग्रास दानशिवाय पुढील योजना उपलब्ध आहेत.

गोग्रास दान-योजना एका दिवसाचा गायीचा चारापाणी खर्च १००/- रु दात्याने देणगीदाराने संस्थेकडे देणे.
मासिक गोग्रास दान- एका महिन्यासाठी ३०००/- रु खर्च संस्थेला देऊन मासिक गोग्रास दान करणे.
वार्षिक गोमाता दत्तक योजना – एका गायीचा वर्षाचा खर्च रु. ३६,०००/- करुन गाय दत्तक घेणे.

मंगलदान-श्रेष्ठदान-गोदान-

या योजनेत देणगीदाराने त्याच्या ऐपतीप्रमाणे किंवा एक गाय खरेदीसाठी रक्कम संस्थेकडे जमा करायची असते. दात्याच्या इच्छेनुसार या गाईचे गोदान संस्करण संस्था करते. अशत: किंवा पूर्णत: या योजनेत सहभाग घेता येतो.

Go Top