गोचर भूमी विकास अभियान

भारतीय गोवंश संवर्धन-अभियान मोहिम गोचर भूमी विकास प्रकल्प ( गायींसाठी गोशाळेसाठी चाराविकास शेत निर्मिती)

नमस्कार! सर्व शेतकरी बंधू भगिनींना आणि कोकणवासीयांसह भारतीय नागरिकांना या आवाहनातून आम्ही विनम्र करीत आहोत. 'भारतीय गोवंश सवर्धन' या आमच्या अभियानातून आम्ही एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. "गोदान-गोसंवर्धन-गोशाळा" अशा या उपक्रमातून आमची संख्या एका गोशाळेच्या पायाभऱणीलाच सुरुवात करीत आहे. यावर्षींच्या गोकुळाष्टमीला ( १ सप्टेंबर २०१०) या उपक्रमाची 'गोदान स्विकारासहीत' सुरुवात झाली आहे. यापुढे हे अभियान अखंडपणे चालविण्यासाठी आपल्या बहुमोल सहकार्यासाठी हे आवाहन आहे.

बदलत्या काळात कोकणात व परिसरात चाराटंचाई आहे. अनेकजण, शेतकरी रानातील गवत काढतच नाहीत. मनुष्यबळाची टंचाई तर प्रचंड आहे. मजुरीचे दरही भरमसाठ वाढलेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर आमच्या संस्थेने 'गोचर भूमी विकास प्रकल्प' हाती घेतला आहे. सुरुवातीला एक एकर क्षेत्रावर कायम चारानिर्मितीसाठी स्वीट कॉर्न (अमेरीकन) व 'यशवंत-२' ही पिके संस्था घेणार आहे. निधी संकलन आणि या प्रकल्पाच्या सहकार्यानंतर पुढे यात वाढ होईल.