गोवंश संवर्धन अभियान

गोवंश संवर्धन – व्यावसायिक दृष्टीही हवी....

'भारतीय गोवंश संवर्धन करताना पारंपरिक दृष्टिकोनाला व्यावसायिकतेची जोड द्यायला हवी, असा दृष्टिकोन रायपाटण (ता. राजापूर, जि. रत्‍नागिरी) येथील नवजीवन विकास सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष गजानन पळसुले-देसाई यांनी मांडली आहे. ही स्वयंसेवी संस्था रत्‍नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेती व शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे.

भारतीय गोवंश संवर्धन अभियान हे गरिबातील गरीब शेतक-याला गरिबीतून श्रीमंतीकडे नेणारे आहे. महात्मा गांधी भारतीय गाईला आशावादी प्राणी मानत. शेळीला ते गरिबाची गाय अशी चळवळ ज्या प्रमाणात व्हायला हवी तशी झाली नाही. सध्या गाईच्या दुधाशिवाय गोमूत्र, गोमय, रुग्णांसाठी तूप आदी पदार्थांच्या निर्मितीचा व्यवसायही मूळ धरत आहे. अनेक विज्ञानवादी, प्रयोगशील व्यक्ती गाईच्या दुधा-तुपावर संशोधन करून निष्कर्षही काढत आहेत. दुग्ध व्यवसायाच्या वृद्धीला, विकासाला ते पूरकच आहे. भारतीय गोवंश संवर्धन चळवळ या अशा प्रयत्नांतून पुढे नेण्यासाठी सर्व अभ्यासू, जाणकार शेतक-यांनी डोळस दृष्टिकोन घेऊन येऊन ही नवी मोहीम स्वत:च्या पातळीवर यशस्वी केली पाहिजे.