देणगी

देणगी-देमोगीगोशाळा-निर्माण

नवजीवनच्या माध्यमातून कोकणात भारतीय गोवंशसंवर्धन अभियान उभे राहत आहे. (कोकणात गोवंशसंवर्धन चळवळ आवश्यकच) कोकणातील गरीब, कष्टकरी, काबाडकष्ट करणा-या, हालअपेष्टा सोसणा-या सर्वसामान्य कुटुंबातील शेतक-याला त्याचे कौटुंबिक आर्थिक गणित, व्यवस्थापन प्रस्थापित होण्यासाठी गोपालन हा एकमेव पर्याय आहे. गायींच्या विविध जाती-वंश, या वंशाचे जतन-संवर्धन आणि सर्वसामान्य शेतकरीवर्गासह महाराष्ट्रातील शेतकरी, गोपालकांना गोसाक्षरता, गोविज्ञान आणि उत्पादने यासाठी 'कोकण दुग्धव्यवसाय विकास प्रशिक्षण केंद्र' निर्माण करण्याचे संस्थेचे स्वप्न आहे. देणगीदारांची काही स्वतंत्र योजना असल्यास आमच्य संस्थेने मागणीचा स्वतंत्र अर्ज विकसीत केला आहे.