" गवां ग्रास प्रदानेनं स्वर्ग लोके महीयते |" स्वतःच्या जेवणापूर्वी गायीसाठी घास काढून ठेवणे ही समृद्ध भारतीय संस्कृतीची ओळख आहे. काही प्रांतात पारंपारिक भारतीय कुटुंबांमध्ये मंगल संस्कार, कुलाचार म्हणून गायीचा गोग्रास वेगळा काढून ठेवण्याची प्रथा आजही पाळली जाते. तेव्हा खालील प्रार्थना केली जाते.
सुरभि वैष्णवी माता नित्यं विष्णुपदे स्थिताः | गौ ग्रासं च मय दत्तं सुरभे प्रति गृह्यताम् ||
नमस्कार ! भारतीय संस्कृतीनुसार गोग्रासदान देणे ही एक समृद्ध आणि पवित्र अशी सर्वज्ञात परंपरा आहे. आजच्या आधुनिक व यांत्रिक संगणक युगातही काही कुटुंबे नियमित गोशाळांना भेटी देऊन नियमित गोग्रासदान, चारा किंवा पशुखाद्य स्वहस्ते अर्पण करतात. आम्ही आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील रायपाटण या गावी आपणा सर्वांना आमच्या "श्रीपाद गो-वृंदावन" या गोशाळेला भेट देण्यासाठी निमंत्रित करीत आहोत. आपण स्वतःच्या हातांनी ओला-हिरवा चारा तसेच समृद्ध पशुआहार आणि गोसेवा प्रत्यक्ष करावी यासाठी आम्ही आपणाला आमच्या गोशाळेत कुटुंबासह येण्यासाठी हे निमंत्रणपत्र देत आहोत.
आमच्या नवजीवन विकास सेवा संस्थेने गोग्रासदान आणि गोचर भूमी विकास यांच्या माध्यमातून एक गोवंश संवर्धन अभियान सुरु केले आहे. गीर व लाल कंधारी या दोन समृद्ध भारतीय देशी जातीच्या दुधाळ गायी व एक गीर वळू आमच्या गोशाळेत आहेत. गोग्रासदान आणि गोवंश संवर्धन अभियान एक विचार प्रवाह म्हणून आम्ही कोकणात रूजवत आहोत.तसेच गोसाक्षरतेचा, गोविज्ञानाचा प्रचार-प्रसार करीत आहोत. गो-पालनातून कौटुंबिक समृद्धीबरोबरच ग्रामीण विकासाला हातभार लागतो व समृद्धी येते. आम्ही राज्यस्तरीय गोवंशप्रेमी ग्रामविकास संमेलन १६/१७ मे २०११ रोजी घेऊन हेच सप्रमाण सिद्ध केले आहे. आमच्या संस्थेची गोग्रासदान - गोशाळा उभारणी निधीदान योजना व उपक्रम पुढीलप्रमाणे ---
नमस्कार !! आपणा सर्वांना या आवाहनातून आम्ही नम्र विनंती करीत आहोत. " भारतीय गोवंश संवर्धन " या आमच्या अभियानातून आम्ही "श्रीपाद गो-वृंदावन" हा अभिनव गोशाळा उभारणी प्रकल्प हाती घेत आहोत. या अभियानात कोकणातील गरीब आणि कष्टकरी गोपालक मोठ्या संख्येने सहभागी आहेत. ही गोवंशसंवर्धन चळवळ अखंडपणे चालविताना लागणाय्रा आपल्या बहुमोल सहकार्यासाठी हे आवाहन आहे. बदलत्या काळात कोकणात व परिसरात चाराटंचाई आहे. अशा पार्श्वभूमीवर आमच्या संस्थेने "गोचर भूमी विकास प्रकल्प" हाती घेतला आहे. सुरुवातीला एक एकर क्षेत्रावर कायम चारानिर्मितीसाठी अमेरिकन स्वीट कॉर्न व यशवंत २ , मका, चवळी, ज्वारी व अन्य एकदल-द्विदल पिके घेण्यास संस्थेला सुरुवात करावयाची आहे. अर्थातच आपल्या उदार व सढळ आर्थिक सहकार्यातूनच हे सर्व साध्य होणार आहे.
भारतीय गोवंश संवर्धन, देशी गायींचे पालन-पोषण-संगोपन या उपक्रमांतून आमची संस्था गो-वत्स संवर्धन करीत आहे. याबरोबरच शेतकय्रांच्या प्रबोधनासाठी आमचे विविध उपक्रम सातत्याने सुरुच असतात. भारतीय परंपरेप्रमाणे "गोदान" हे सर्वात पवित्र दान मानले गेले आहे. या दानासाठी संस्था व्यक्तिगत स्तरावर सहकार्य करते. प्रत्यक्ष गोसेवा, गोमाता दत्तक योजना, गोदान मंगल संस्कार, गोचर भूमी विकास अशा योजनांतून गोवंश संवर्धन अभियान सुरु आहे.
आपण दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक व वार्षिक गोग्रासदानासाठी आर्थिक मदत म्हणून निश्चित निधी संस्थेकडे पाठवू शकता. आपल्या गोग्रासदानरूपी आर्थिक मदतीतून गायींचा, गोवंशाचा संबंधित खर्च केला जातो. आपणाला कोणत्याही शुभप्रसंगी, नातेवाईकांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ गोदान करण्याची इच्छा असल्यास संस्थेशी संपर्क करावा.
अ.नं. | योजनेचे नाव | दैनिक | साप्ताहिक | पाक्षिक | मासिक | वार्षिक |
१) | गोग्रासदान | १००/- रु. | ७००/- रु. | १५००/- रु. | २५००/- रु. | २१०००/- रु. |
२) | गोदान | गीर,थारपारकर,साहीवाल,लाल कंधारी,देवणी,गौळाऊ सारख्या गाईंसाठी ३५००० रू.ते ५०,००० रू. किंवा व्यक्तिगत अंशतः वा सामूहिक गोदान योजनेत सहभाग घेणे. | ||||
३) | गोचर भूमी विकास | प्रति गुंठा हिरवा चारा विकसनासाठी ३०००/- रु. सहभाग | ||||
४) | प्रात्यक्षिक गोसेवा | संस्था व गोशाळेला प्रत्यक्ष भेट देऊन गोसेवा करणे. | ||||
टीपः या सर्व योजनांच्या विस्तृत माहितीसाठी स्वतंत्र पत्रक संस्थेने तयार केलेले आहे. |
*देणगीदारांसाठी माहिती*
* संस्थेच्या बँक खात्यासंबंधी माहिती *
नाव - नवजीवन विकास सेवा संस्था, बॅंक ऑफ महाराष्ट्र, शाखा - राजापूर.
बॅंक अकाउंट नं. : 60037660399
IFSC CODE : MAHB0000319.
PAN NUMBER : AABTN3415F.
बॅंक ऑफ इंडिया शाखा : पाचल. 1419110100003952
IFSC CODE : BKID0001419.
PAN NUMBER- AABTN3415F.
संवाद ध्वनी : 9420055268, 9222728309, 9422912731
ई - मेल : gajanan2498@gmail.com, plslds@yahoo.co.in
वेब - साईट : www.nvssindia.com, www.godan.in