आमच्या या गोवंशसंवर्धन अभियानात आपणही सहागी होऊ शकता. प्रत्येक भारतीय नागरिकाने गाय पाळयलाच हवी असे नाही. आपण आपल्या कमाईतून गाईंसाठी 'गोग्रास दान' देऊ शकतो. आपल्या गोग्रास दानाची आपणाला नवजीवनतर्फे रितसर पावती दिली जाईल आणि उपयोगिता प्रमाणपत्रही.
गाईला चारापाणी, अन्नदान, खाण्याचा खुराक म्हणजे गोग्रास. पारंपरिक श्रद्धेनुसार मंगलकार्यात, आनंदमय प्रसंगात, मृत्यूपश्चात कार्यात व विधीत गायीला गोग्रासाचे म्हणजेच अन्नदानाचा विधी सांगितला आहे. आमची संस्था यासाठीच गाय 'गोग्रास दान' स्विकारते १ दिवस खर्चानुसार १ दिवसासाठी ते संपूर्ण वर्षासाठी खर्च स्विकृत केला जातो. साधारणत: दिवसाचा खर्च सध्या १००/- रु गृहित आहे. गोग्रास दानशिवाय पुढील योजना उपलब्ध आहेत.
गोग्रास दान-योजना एका दिवसाचा गायीचा चारापाणी खर्च १००/- रु दात्याने देणगीदाराने संस्थेकडे देणे.
या योजनेत देणगीदाराने त्याच्या ऐपतीप्रमाणे किंवा एक गाय खरेदीसाठी रक्कम संस्थेकडे जमा करायची असते. दात्याच्या इच्छेनुसार या गाईचे गोदान संस्करण संस्था करते. अशत: किंवा पूर्णत: या योजनेत सहभाग घेता येतो.
आपल्या संस्कृतीत व परंपरेत गाय व गोदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गायीला चारा किंवा सुग्रास खाद्य देणे, गायीला गोग्रास देणे ही तर आपली परंपराच आहे. आजही अनेक घरांत सणासुदीच्या दिवशी गायीला गोग्रास दिला जातो. काही घराणी तर अशी आहेत की त्यांच्याकडे अशा सणासुदीला अगोदर गायीला अन्न व गोग्रास देऊन संतुष्ट केले जाते व त्यानंतरच घरांतील मंडळी भोजन घेतात. हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे आजकाल धकाधकीच्या व वेगवान शहरी संस्कृतीत यातील अनेक गोष्टी शक्य नाहीत. यासाठीच आम्ही खात्रीशीर व विश्वसनीय अशाप्रकाराने कोकणात साकार होत असलेल्या आमच्या आडवली ता. राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथील गोशाळेत अशा विविध संस्कारांचे आयोजन आम्ही करणार आहोत. आमच्याकडे ओबडधोबड बांधलेली अशी सुमारे तीस गायी राहतील अशी एक गोशाळा अर्धवट तयार आहे. या गोशाळेच्या उन्नतीसाठी व जिर्णोध्दारासाठी आम्ही हे देणगीचे आवाहन करीत आहोत. ( आमची गोशाळा मान्यताप्राप्त व शासकीय मान्यता व नोंदणी असलेली आहे. धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी केलेली आहे. )
कोकणातील आडवली ता. राजापूर या गावी नवजीवनची गोशाळा आकार घेत आहे. कोकणबाग निवांतनिवास या साकार होत असलेल्या एका निसर्गरम्य प्रकल्पाच्या परिसरातच ही गोशाळा साकार होणार आहे. कोकणात तसं म्हटलं तर गोशाळा संस्कृती फारच कमी आहे. कोकणातील शेतकरीही खिलार जोडी किंवा ढवळ्या – पवळ्या, सर्जा – राजा, शामा व सुंदर ही गावठी बैलजोडी संस्कृती सोडून लहानमोठ्या पॉवरटीलवर शेतकरी शेती करू लागले. साहजिकच कोकणातील शेतकरी हळूहळू बैल, गायी या संस्कृतीपासून तसं म्हटलं तर दुरावत चाललेला आहे.
अशा पार्श्वभूमीवर कोकणात काही ठिकाणी पुन्हा देशी गायी आणि देशी गायीचं दूध यासाठी चळवळ जोर धरीत आहे. आम्ही याच सर्वांची गरज लक्षात घेऊन कोकणात राजापूर तालुक्यात सौंदळ गावाजवळ एक आधुनिक व सुसज्ज अशी गोशाळा उभारणी करीत आहोत. या गोशाळेत शालेय मुलांसह कोकणातील गोवंशप्रेमी युवक व युवतींसाठी तसेच गोवंशप्रेमी मंडळींसाठी गोसाक्षरता कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. कोकणातील गोवंशप्रेमीनाच नव्हे तर आमच्या सुसज्ज गोशाळेत विविध गोवंशाधारीत गायींच्या सहवासात प्रशिक्षणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा आमचा हेतू आहे. आम्ही यासाठी शालेय मुलांनाही गोवंशसाक्षरता यावी यासाठी कार्यरत राहणार आहोत. आमच्या या प्रकल्पात कोकणातील व अन्य महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी गोवंशाधारीत स्वावलंबन योजनांसाठी सक्षम करण्यासाठी कार्यशाळा घेण्याचे नियोजन आम्ही करीत आहोत.
अ) दिवंगत आई किंवा वडिलांच्या किंवा अत्यंत जवळच्या प्रियजनाच्या निधनानिमीत्त कायम स्मरणार्थ देणगी.
ब) कोणत्याही प्रियजनांच्या वाढदिवसानिमीत्त गोशाळेला भेट देऊन देणगी.
क) गोशाळेत गाय दान ( गोदान ) करून देणगी देणे.
आपण वरीलपैकी कोणत्याही कार्यात सहभाग घेऊ शकता. आपणाला या सर्वांची रितसर पावती मिळेल. आपणाला यापेक्षा काही वेगळे करायची इच्छा असेल तर आपण आमच्याशी थेट संपर्क करू शकता.